Slider 1


Slider 2


Slider 3

आमची संस्था

नॅशनल लायब्ररी,वांद्रे 

''जिल्हा अ'' ग्रंथालय

स्थापना वर्षे - १९१७

ग्रंथालय

ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, हिंदी व गुजराती या चार भाषांचा समृध्द संग्रह असून विषयानुसार सर्व पुस्तकांचे वर्गीकरण केलेले आहे

अभ्यासिका

वातानुकूलित अभ्यासिकेमध्ये विविध शाखांमधील विद्यार्थी एकाग्रतेने अध्ययन करीत असतात

सभागृह

नॅशनल लायब्ररी,वांद्रे संस्थेचे सुसज्ज वातानुकूलित सभागृह

आमची वैशिष्टये

मुक्तद्वार वाचनालय

मोफत वृत्तपत्र वाचनालयात मराठी, हिंदी, गुजराथी, उर्दु व सिंधी भाषेतील वर्तमानपत्रे तसेच पाक्षिके, दैनिके वाचनासाठी ठेवली जात असून संस्थेची सभासद नसलेली कुठलीही व्यक्ती या विभागात येऊन विनामूल्य लाभ घेऊ शकतात, तसेच तीन महिन्या पर्यंतची वर्तमानपत्रे संस्थेमध्ये ठेवली जातात..

संदर्भ विभाग

संदर्भ विभागात साहित्यसुची कोश इतिहास मराठी ग्रंथसूची गॅझिटियर चरित्र कोश संस्कृती कोश अशा प्रकारची तीन हजाराहून अधिक पुस्तक व खंड आहेत. १९५१ पूर्वी प्रसिध्द झालेल्या मराठी पुस्तकांच्या ३३ मायक्रोफिल्म (सूक्ष्म फिती) आहेत.

स्वाक्षरी विभाग

नामवंत लेखकांच्या स्वाक्ष-या असलेल्या अनेक ग्रंथाचे येथे खास जतन केले आहे.

नृत्य कार्यशाळा

५ ते १२ वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी येथे नृत्य कार्यशाळा डिसेंबर २०१२ पासून सुरू करण्यात आली आहे.

किशोर विभाग

पुस्तक हेच असे एकमेव शाश्वत व सक्षम साधन आहे ज्याच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो ,म्हणूनच मुलांच्या दृष्टिने उपयुक्त असा सर्व विषयांवरिल पुस्तकांनी तसेच मासिकांनी समृध्द असा किशोर विभाग कार्यरत आहे.

मासिक विभाग 

मासिक विभागात मराठी, इंग्रजी हिंदी भाषांची एकूण ८१ मासिके येतात.

साखळी योजना

मुंबई उपनगर जिल्हयामधील नॅशनल लायब्ररी, वांद्रे हे जिल्हा अ श्रेणीतील ग्रंथालय असल्यामुळे यात साखळी योजना राबविली जाते त्यामध्ये इतर १०-१२ ग्रंथालय सभासद असून त्यांना २०-२५ पुस्तके एका वेळेस दिली जातात.

दिवाळी अंक योजना

दिवाळी अंक योजनेसाठी सभासदांकडून स्वतंत्र अनामत रक्कम, माफक वर्गणी तसेच प्रवेश वर्गणी स्विकारली जाते.  या विभागातील दिवाळी अंक मासिक विभागातील सभासदांना त्यांच्या नियमित मासिक वर्गणीमध्ये सहा महिन्यानंतर वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात.  तसेच एक वर्षानंतर सदर दिवाळी अंक संस्थेच्या साधारण तसेच तहह्यात सभासदांना विनामुल्य वाचनासाठी उपलब्ध करून दिले जातात..


ग्रंथालय सभासद वर्गणी तक्ता

आजीव वर्ग


  • -

  • कायम अनामत रू.३००/-

  • शुल्क रु.५०००/-

मासिक विभाग


  • प्रवेश वर्गणी रू.२५/-

  • अनामत रु.१००/-

  • प्रति महिना शुल्क रु.५०/-